• English
  • मराठी

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

पनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस ऑफ बोर्ड उत्तर प्रदेश व इंडिया यूनिव्हर्सिटी यांच्या वतीने १३ व १४ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. रुपेश पावशेला मिळेल्या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता सदीच्छा दिल्या.