• English
  • मराठी

नावडे गाव येथे होत असलेल्या उड्डाणपूला संदर्भात MMRDA चे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या सोबत पाहणी केली .

नावडे गाव येथे होत असलेल्या उड्डाणपूला संदर्भात MMRDA चे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या सोबत पाहणी केली . या उड्डाण पुलामुळे नावडे गाव व नावडे फेज २ येथे नागरिकांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते दिनेश खानावकर, विशाल खानावकर, प्रशांत खानावकर, मदन खानावकर, प्रितम म्हात्रे, जितू काटकर, राम खानावकर, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पोरजी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यापूर्वीसुद्धा या संदर्भात २९ ऑगस्ट २०२० रोजी पाहणी करून या उड्डाण पुलामुळे नावडे गाव व नावडे फेज २ येथे नागरिकांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या होत्या. या उड्डाण पुलामुळे ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर नव्याने आखणी करावी असे निर्देश दिले होते. काही प्रमाणात त्यात सुधारणा करण्यात आले असून नागरिकांच्या सूचना यात पूर्ण न झाल्याने पुन्हा त्यात सुधारणा करून त्या संदर्भात बैठक लावावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.