• English
  • मराठी

गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न

पनवेल तालुक्यातील गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्नासंदर्भात सिडको भवन येथे अभियंता श्री. मुळे यांच्याशी उरणचे श्री. आमदार महेश बालदी यांच्या समवेत चर्चा केली.
या वेळी सिडकोचे अभियंता श्री. मुळे यांनी पुढील 15 दिवसांच्या आत न्हावे व न्हावेखाडी गावासाठी शिवाजीनगर येथून हेटवणे धरणाची नवीन पाईपलाईन टाकून देणार आहोत तसेच जोपर्यंत लाईन टाकून होत नाही तोपर्यंत दिवसाला कमीत कमी चार टँकर पाणी न्हावे ग्रामपंचायतीला देऊ, तर गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील पाणीप्रश्नी स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करू, असे आश्वासन दिले आहे.