• English
  • मराठी

सहयोग सेवा संस्थान यांच्या वतीने आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाला भेट

 

 

सहयोग सेवा संस्थान यांच्या वतीने पनवेल मध्ये गोस्वामी तुलसीदास कृत अखंड रामनाम पठण तसेच इतर सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन या संस्थानाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सहयोग सेवा संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्यात मोलाची कामगिरी बजावत आहे. अशाच काही महिलांच्या बचत गटांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते. यावेळी या प्रदर्शनाला भेट देऊन तेथील काही वस्तू खरेदी करण्याचा मोह मला आवरला नाही.