• English
  • मराठी

श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वीणा व कलश पूजन

 

श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळ यांच्या वतीने खांदा कॉलनी येथे “श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा” आयोजीत करण्यात आला आहे. पोलिस स्टेशन समोरील मैदानात या सोहळ्यानिमीत्त ७ ते १४ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल मधील वारकरी बांधवांसह मी देखील या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन वीणा व कलश पुजन केले. यावेळी संपूर्ण परिसर विठ्ठलनामात दुमदुमून गेला होता.