अतिवृष्टी आणि महापुरामुळे केरळ राज्य उद्ध्वस्त झाले असून विविध संस्था आणि संघटना तसेच राजकीय पक्षांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वस्तरातून आवश्यक मदत करण्यात येत आहे. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या वतीने सुद्धा पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. केरळमध्ये महापूर आल्याने तेथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. पनवेल तालुका आणि शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी तांदूळ, डाळ, पाणी तसेच इतर जीवनावश्यक साहित्य मदत म्हणून पाठविले आहे. केरळमधील जनतेसाठी तुम्हीही मदतीचा हात पुढे करू शकता. मदतीसाठी तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचा चेक तुम्ही ‘Chief Minister Kerala Flood Relief Fund’ या नावाने किंवा ती रक्कम थेट अकाऊंट मध्ये पुढील माहितीनुसार पाठवू शकता. A/c. No. 60312978149 Bank of Maharashtra Mantralaya branch IFSC MAHB0001388
अतिवृष्टी आणि महापुरामुळे केरळ राज्य उद्ध्वस्त झाले असून विविध संस्था आणि संघटना तसेच राजकीय पक्षांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वस्तरातून आवश्यक मदत करण्यात येत आहे. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या वतीने सुद्धा पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. केरळमध्ये महापूर आल्याने तेथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. पनवेल तालुका आणि शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी तांदूळ, डाळ, पाणी तसेच इतर जीवनावश्यक साहित्य मदत म्हणून पाठविले आहे. केरळमधील जनतेसाठी तुम्हीही मदतीचा हात पुढे करू शकता. मदतीसाठी तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचा चेक तुम्ही ‘Chief Minister Kerala Flood Relief Fund’ या नावाने किंवा ती रक्कम थेट अकाऊंट मध्ये पुढील माहितीनुसार पाठवू शकता.
A/c. No. 60312978149
Bank of Maharashtra
Mantralaya branch
IFSC MAHB0001388