पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे तालुक्यातील चार जिल्हापरिषद गटांची संख्या कमी झाली आहे. उरण विधानसभा मतदार संघात पनवेल तालुक्यातील चार जिल्हापरिषद गट येतात म्हणून पनवेल आमसभेचे अध्यक्षपद आमदार मनोहर भोईर यांच्याकडे आले असून गुरुवारी (दि. १६) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आमसभा आ.भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आमसभेत आपण व आमदार मनोहर भोईर यांनी, अधिकाऱ्यांना सूचना करताना लोकांच्या तक्रारींना संपर्क, उत्तर व योग्य कार्यवाही करण्याचे आवाहन केले. या सभेत पंचायत समिती, सिडको, वीज वितरण, वन, परिवहन, ग्रामीण रुग्णालय, भूमी अभिलेख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागातील समस्या व त्यांचा आढावा घेण्यात आला.