• English
  • मराठी

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 12) करण्यात आले. हे सामने 19 मेपर्यंत सुरू राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा महात्मा फुले कॉलेज, पनवेल अर्थात एएससी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. या लीगमधून जमा होणारा निधी खेळाडूंच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार आहे.