• English
  • मराठी

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय खांदा कॉलनी येथे करण्यात आले होते . या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश होता. स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राथमिक फेरीतील विजेत्या स्पर्धकांना 19 फेब्रुवारीला सातारा येथील अजिंक्यतारा गड येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धक म्हणून संधी मिळणार आहे.
या स्पर्धेतील वैयक्तिक गटात 63 स्पर्धकांनी, तर सांघिक गटात नऊ स्पर्धक संघानी सहभाग घेतला. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी एकाहून एक सरस सादरीकरण केले.
या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन स्पर्धकांचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.