भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनिल संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती पनवेल समिती, अथर्व मीडिया वर्ल्ड आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचे आयोजित केला होता.