पनवेल उप -जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती आरोग्य उप संचालक डॉक्टर गौरी राठोड यांचे सोबत चर्चा केली असता देण्यात आली.
पनवेल उप -जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती आरोग्य उप संचालक डॉक्टर गौरी राठोड यांचे सोबत चर्चा केली असता देण्यात आली. आरोग्य उप संचालक डॉक्टर गौरी राठोड, रायगडचे सिव्हिल सर्जन गवळी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्रावणे ,उप अभियंता कांबळे आणि महापालिकेचे आरोग्य सभापती डॉक्टर अरूणकुमार भगत यांच्या सोबत रुग्णालयाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्रावणे यांनी नोव्हेंबर २०१८ पर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती यावेळी दिली