पनवेल मधील विरुपाक्ष मंदिर देवस्थानची शहरातील ४२०० चौ. मी. च्या मोकळ्या जागेचा योग्य वापर करण्यात यावा या उद्देशाने नवीन विश्वस्त मंडळाने भव्य दिव्य स्वरूपातील मंगल कार्यालयाची उभारणी केली.
पनवेल मधील विरुपाक्ष मंदिर देवस्थानची शहरातील ४२०० चौ. मी. च्या मोकळ्या जागेचा योग्य वापर करण्यात यावा या उद्देशाने नवीन विश्वस्त मंडळाने भव्य दिव्य स्वरूपातील मंगल कार्यालयाची उभारणी केली. त्याचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, स्वामीसखा सुमंतसरस्वती आठल्ये सर, श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्राचे अध्यक्ष अजित कारखानीस, पनवेल मनपाच्या महापौर डॉ.सौ.कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकुर, माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह विरुपाक्ष मंदिर देवस्थानचे विश्वस्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरुपाक्ष मंदिर देवस्थानाने लोकोपयोगी मंगल कार्यालय उभारून समाजाप्रती बांधिलकी जपली असल्याचे महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पनवेल येथे मंगल कार्यालय लोकार्पण सोहळया प्रसंगी सांगितले.