विजयपताका श्रीरामांची, गर्जते अंबरी । प्रभू आले हो मंदिरी, राम आले हो मंदिरी ||
अयोध्येत प्रभू श्रीरामांची मोठ्या आनंदी आणि भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना झाली. हा क्षण म्हणजे कोट्यवधी भारतीयांसाठी इच्छापूर्तीचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होय. अयोध्येतील हा युगप्रवर्तक सोहळा साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने पनवेल नगरीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रविवारी “मन हे राम रंगी रंगले”, हा श्री रामगाथा सांगणारा सुश्राव्य मराठी गीत व अभंगांचा कार्यक्रम मराठी संगीतसृष्टीतील आघाडीच्या गायिका सावनी रवींद्र, रश्मी मोघे व गायक जयदीप गायकवाड यांनी सादर केला. हा कार्यक्रम ऐकताना पनवेलकर मंत्रमुग्ध होऊन राम रंगी रंगले होते.. या कार्यक्रमासोबतच अयोध्या येथील राम मंदिर प्रतिकृतीचे उद्घाटन, श्रीराम अक्षता पूजन आणि पनवेलमधील कारसेवकांचा सत्कार सोहळाही संपन्न झाला.
आजच्या प्राणप्रतिष्ठापना व भव्य मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळी स्वा. सावरकर चौक येथून प्रभू श्रीरामांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. गुजराती शाळेच्या मैदानात या मिरवणुकीची समाप्ती झाली. त्यानंतर पनवेलकरांसह प्रभू श्रीरामांच्या सुरेख मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा दूरदृश्यप्रणालीद्वारे याची देही, याची डोळा अनुभवला.. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि संघर्षानंतर आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करताना पाहून आनंदाने ऊर भरून आला. हा आनंद सर्वांबरोबर जल्लोषात साजरा केला.
जय श्रीराम!