• English
  • मराठी

ओरॉयन मॉल पनवेल येथे ‘आय लव्ह पनवेल’ या अक्षर मुद्रांचे अनावरण कार्यक्रम

ओरॉयन मॉल पनवेल येथे ‘आय लव्ह पनवेल’ या अक्षर मुद्रांचे अनावरण कार्यक्रमास कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, मंगेश परूळेकर आदी उपस्थित होते.
‘आय लव्ह पनवेल’ या घोषवाक्याचे आज अनावरण करून पनवेलकरांना अभिमान वाटावा अशा जागेची शहरात भर पडली आहे. पनवेल म्हणून अभिमान वाटावा या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि महापालिका काम करीत आहे. त्या अनुषंगाने अशा जागा वाढत राहाव्यात आणि खरोखर बाहेरून येणार्‍यांनी पनवेलच्या प्रेमात पडावे, असे शहर निर्माण करण्यासाठी आपण सर्व जण काम करीत राहू या.