नवी मुंबईतील राजीव गांधी कॉलेजचा महोत्सव “प्रारंभ – नवी मुंबई” तिसऱ्या पर्वाचे आयोजन मोठया उत्साहात संपन्न झाले. या महोत्सवाच्या समारोह सोहळ्यात गरजू मुलींना शालोपयोगी वस्तू व कपडे प्रदान करण्यात आले.

या वेळी एम टीव्ही रोडीज ची विजेती श्वेता मेहता, नृत्य दिग्दर्शक पराग – प्रयास , “इशारे तेरे ” व “ले जारे” या गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली गायिका ध्वनी भानुशाली, टि पी सिंग (राजीव गांधी कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी), सतीश निकम, गायक संतोष चौधरी (दादूस) तसेच इतर कलाकार उपस्थित होते. विविध खेळ व स्पर्धामध्ये सहभागी प्रतियोगिताना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले विजेता स्पर्धकांना त्यांचा निकाल घोषित करून पारितोषिक प्रदान करण्यात आले त्यामध्ये अभिनय, गायन, नृत्य, लघुपट, पथनाटय, निबंध आणि कथा लेखन तसेच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम अश्या तब्बल ५२ स्पर्धांचा सहभाग होता.