जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.
जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.