महामंत्र निरोगी जीवनाचा… संकल्प करूया नित्य योग करण्याचा…
मन शांत करून आत्म्याशी एकरूप होण्याची क्रिया म्हणजे योग.. भारतीय संस्कृतीमध्ये योगसाधनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग हा भारतीय प्राचीन संस्कृतीचा एक समृद्ध वारसा असून समस्त मानवजातीसाठी एक वरदान आहे. भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य वारसा जपण्यासाठी जागतिक योग दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वडाळे तलाव येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी होऊन योग शिबिराचा आनंद घेतला.