पनवेल नगरपालिका हद्दीतील 24 महसुली गावांत गावठाण क्षेत्राची मोजणी
1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 30 महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे व जनतेस अधिकार अभिलेख प्रदान करण्याच्या कामाबाबत महानगरपालिकेने भूमी अभिलेख संचालक, पुणे यांच्याशी संपर्क साधत मागणी व सातत्याने पाठपुरावा केला होता, या पाठपुराव्यास यश आले असून त्यानुसार पनवेल नगरपालिका हद्दीतील 24 महसुली गावांत गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा व मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यास शासनाने मान्यता देत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.