पनवेल महापालिका हद्दीत करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदी बाबत व्यापर्यांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्याविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील व्यापाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
पनवेल महापालिका हद्दीत करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदी बाबत व्यापर्यांमध्ये जागृती करण्यासाठी आणि त्याविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील व्यापाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यालय, मार्केट यार्ड पनवेल येथे पनवेल शहरातील व्यापाऱ्यांसाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले होते. नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, अनिल भगत, अजय बहिरा, मुग्धा लोंढे व संजय भोपी व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. पनवेल महापालिकचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी प्लास्टिक बंदी कायद्यातील ज्या बाबीवर बंदी आहे, त्याची माहिती देऊन कायदेशीर कारवाई आणि त्याबाबतच्या तरतुदींची माहिती दिली. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शहरातील सोने, चांदी, कपडे, किराणा व हॉटेल व्यावसायिकांच्या शंकांचे निरसन सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी केले.