• English
  • मराठी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६० वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवरांच्या व हजारॊ रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६० वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवरांच्या व हजारॊ रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांचा कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे कर्मवीर भूमीत समारंभपुर्वक हृद्य सत्कार करण्यात आला.