पुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना भाजपकडून अन्न-पाण्याचे वाटप करण्यात आले.
या अतिवृष्टीमुळे महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी या विवंचनेत ते आहेत. या सर्व नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुरुकुल शाळेत मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे, तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापार्यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत.
हि सर्व मंडळी अतिशय धीराने या संकटाचा सामना करत आहेत. आम्ही या संकटकाळात त्यांच्या सदैव सोबत आहोत.