नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा खारकोपर येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.

खारकोपर रेल्वेस्थानक आवारात आयोजित या सोहळ्यास मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, रेल्वे व कोळसा मंत्री मा. श्री. पीयूष गोयल यांच्या सह केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. श्री. अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. विनोद तावडे, राज्याचे बंदरे, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री.रविंद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, इतर मान्यवर तसेच रेल्वे, सिडको प्रशासनाचे अधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी खारकोपर – बेलापूर लोकलला हिरवा झेंडा दाखवताच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित स्थानिक नागरिकांनी आपले स्वप्न पूर्ण झाल्याने पहिल्या लोकलचे स्वागत करताना घोषणांनी खारकोपर रेल्वे स्थानक दणाणून सोडले. उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो..