भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कालाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘CM चषक २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कालाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘CM चषक २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचाचा एक भाग म्हणून पनवेलमधील तालुका क्रीडा संकुल येथे कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ८ आणि ९ डिसेंबर दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांच्या हस्ते तसेच महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.