• English
  • मराठी

मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अर्थसंकल्पाची संपूर्ण देशाला उत्सुकता होती. कोविडच्या काळातही जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या मोदी सरकारने या अर्थसंकल्पातही देशाच्या हिताचे निर्णय घेऊन व तरतूद करत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असून गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांचा विचार करून देश आत्मनिर्भर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.