‘भाजपा संघटन पर्व 2019’
राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेले भारतीय जनता पक्ष हे देशाची अखंडपणे सेवा करणारे कुटुंब आहे. देशाच्या हितासाठी झटणाऱ्या या पक्षात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यासाठी ‘भाजपा संघटन पर्व 2019’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पनवेलच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉक्टर अरुण चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय उपस्थित होते.