• English
  • मराठी

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरण

पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीतून आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या संकल्पना व पाठपुराव्या बद्दल त्यांचे यावेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक करण्यात आले.