स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी धर्मवीर होते, आहेत आणि सदैव राहणारच !!!
अजित पवारांच्या विरोधात भाजपाच्या वतीने पनवेल मध्ये निदर्शने
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पनवेल भाजपा च्या वतीने राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते श्री. अजित पवार यांच्या विरोधात पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. संतप्त जमावाने “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” अशा आशयाच्या घोषणा देत अजित पवारांच्या विरोधात निदर्शने केली. अजित पवारांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेल्या दिव्य बलिदानाचा आणि हौतात्म्याचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू प्रेमींची सपशेल माफी मागितली पाहिजे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून अजित पवारांनी माफी नाही मागितली तर भाजपा येणाऱ्या काळात या ही पेक्षा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा या आंदोलना दरम्यान देण्यात आला.