तळोजा येथील भुयारी मार्गाची पाहणी दौरा केली.
तळोजा येथील रेल्वे फाटकावर नेहमी प्रचंड ट्राफिकचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी एवढी प्रचंड असते की त्यामुळे मुंब्रा-पनवेल महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा पोहचतात व महामार्गावर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भूयारी मार्गाचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, ०७ नोव्हेंबर रोजी सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत या भुयारी मार्गाची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनुसार या भूयारी मार्गाचे काम जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, तळोजा फेज १ मधील रस्त्यांचे येत्या आठवड्यात डांबरीकरण करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
यावेळी सिडको चीफ इंजीनियर श्री. चौटालीया, मेट्रोचे श्री. पुजारी, एस. ई. रोकडे, कार्यकारी अभियंता मिलिंद म्हात्रे, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, युवा मोर्चाचे महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, तळोजा शहर अध्यक्ष निर्दोष केणी, जगदिश घरत, संतोष पाटील आदी उपस्थित होते.