पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल, करंजाडे आणि सिडको वसाहतीत पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने बैठकीत सिडकोच्या अधिकाऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीत मागील आठवड्यापासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल झाले. यावेळी सिडको प्रशासनाने तेथे टँकरने पाणी पुरवठा केला नाही किवा त्याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती दिली नव्हती. यावेळी सामान्य नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यास सांगून अमृत योजना पूर्ण होईपर्यंत पाईपलाईनच्या दुरुस्तीची कामे त्वरित करून घेण्याचे आणि पाणी येणार नसल्यास त्याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आदेश दिले. याचप्रमाणे सिडको वसाहतींमधील कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील तोडलेली जलकुंभ पुन्हा बांधण्यात येणार आहेत.