• English
  • मराठी

“आमदार चषक 2022” या दोन दिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

माझ्या वाढदिवसानिमित्त मा. पंचायत समिती सदस्य श्री. निलेश पाटील, श्री. प्रशांत कर्पे, श्री.सुमित झुंजारराव यांच्यामार्फत मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात “आमदार चषक 2022” या दोन दिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जगविख्यात क्रिकेटपटू श्री. दिलीपजी वेंगसरकर यांच्यासह या क्रिकेट स्पर्धेचे तसेच रायगड प्रिमीअर लीगच्या फॉर्म रजिस्ट्रेशन व संकेतस्थळाचे उद्घाटन केले. यावेळी पनवेल मधील भाजपचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे पनवेल मधील क्रिकेटपटूंच्या क्रीडागुणांना वाव मिळत असल्याचा आनंद आहे.