रस्ता सुरक्षा अभियान
भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडळ व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत वाहन चालकांसाठी सुरक्षेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी मद्यपानामुळे होणारे अपघात, रस्तावरील अपघात कारणे व अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांची शिस्त पाळणे, अपघात होऊ नये किंवा कसे टाळता येतील याबाबत प्रभावी जनजागृती, अपघातातून होणारी मनुष्यहानी तसेच राष्ट्रीय हानी यासंदर्भात माहिती देण्यात आली.