• English
  • मराठी

उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक

उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी महिलांच्या संरक्षणासाठी सक्षम टीम तयार करणार अशी माहिती उमाताई खापरे यांनी आज येथे दिली.