• English
  • मराठी

खांदा कॉलनी येथे सुरु असलेल्या सप्ताहाला राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट

खांदा कॉलनी येथे श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांनी भेट देत श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. पोलीस ठाण्यासमोरील मैदानात आयोजित या सोहळ्यासाठी मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्यासह पनवेल भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.