• English
  • मराठी

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना झालेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून राज्यव्यापी आंदोलने करण्यात येत आहेत.
पनवेल भाजपच्या वतीने जनसंपर्क कार्यालय, पनवेल येथे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. नवाब मलिकांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.