मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे.
मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे. रायगडचे स्थान आणि महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक सुद्धा याच ठिकाणी झाला. त्यामुळेच या पवित्र स्थळी आज शिवराज्याभिषेक उत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण रायगड छत्रपती शिवरायांच्या नावाच्या गर्जनेने दुमदुमला होता.