• English
  • मराठी

तौक्ते चक्रीवादळची झळ अलिबाग आणि रायगड जिल्ह्याला देखील बसली आहे . या भागात बरेच नुकसान देखील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत आज कोकण पाहणी दौरा केला.

तौक्ते चक्रीवादळची झळ अलिबाग आणि रायगड जिल्ह्याला देखील बसली आहे . या भागात बरेच नुकसान देखील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत आज कोकण पाहणी दौरा केला.
दौऱ्यादरम्यान अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांच्याकडून सद्यपरिस्थितीतचा आढावा घेतला गेला,तसेच बंदरावरती मच्छीमार बोटिंचे झालेले नुकसान,कोसळलेले पाण्याचे मोठे जलकुंभ,घरांची झालेली पडझड या सर्वांची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे करून मदत देण्यासाठी मागणी केली तसेच यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सन्मा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले…
या प्रसंगी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रविणजी दरेकर आणि रायगडचे मा. पालकमंत्री सन्माननीय रविंद्रजी चव्हाण व आ.महेश बालदी , महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांतजी पाटील , इतर मान्यवर उपस्थित होते