• English
  • मराठी

पर्जन्ययाग संयोजन समिती पनवेलच्यावतीने शहरातील बल्लाळेश्वर मंदिरात ‘पर्जन्ययाग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संवत्सरात पर्याप्त पर्जन्यमान व्हावे, यासाठी पर्जन्ययाग संयोजन समिती पनवेलच्यावतीने शहरातील बल्लाळेश्वर मंदिरात ‘पर्जन्ययाग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी नगरसेवक नितीन पाटील, राजू सोनी, नगरसेविका रुचिता लोंढे, मनोहर ओझे, गुरुनाथ लोंढे, आदी उपस्थित होते.