• English
  • मराठी

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण

 

चिरनेर जंगल सत्याग्रहावेळी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 92 वा स्मृतिदिन. यानिमित्त ग्रामपंचायत चिरनेर च्या विद्यमाने व रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती उरण यांच्यावतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर चिरनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.