खारघर सेक्टर १९ येथे आयुर्वेदिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ
मनोज बी. पाटील यांनी यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर १९ येथे सुरू केलेल्या “आयुर्वेदिक आरोग्य केंद्राचे” उद्घाटन करून यानिमित्त मनोज यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. दरम्यान या केंद्राच्या उद्घाटनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.