• English
  • मराठी

रवी गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मोफत सायकल वाटप

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता नगरसेविका मा.सौ. हेमलता गोवारी आणि जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री. रवी गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मोफत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते मा. श्री. रामशेठजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहून नगरसेविका मा.सौ. हेमलता गोवारी आणि जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट यांनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.