• English
  • मराठी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ‘पुण्यतिथी कार्यक्रम’ व त्यानिमित्त ‘रक्तदान शिबीर’ पार पडले.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ‘पुण्यतिथी कार्यक्रम’ व त्यानिमित्त ‘रक्तदान शिबीर’ पार पडले. स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थासाठी कार्य करणारे स्व.जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवा नोड येथे केले.