• English
  • मराठी

पनवेल महापालिकेच्यावतीने पनवेल शहरात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण अभिवादन केल्यानंतर ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. पनवेल महापालिकेच्यावतीने पनवेल शहरात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. विविध शाळा, संस्थांचे विद्यार्थी, चित्ररथ, लेझीम पथक या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. अनेक मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडोच्या संख्येने शिवप्रेमी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.