राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता सेवा संवाद’ पदयात्रेचा पनवेलमधील दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता सेवा संवाद’ पदयात्रेचा पनवेलमधील दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पदयात्रेस सकाळी ८ वाजता नेरे येथून सुरुवात झाली. या पदयात्रेच्या निमित्ताने भाजप सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यात आली; तर ग्रामस्थांकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेची सांगता भिंगारवाडी येथे झाली.