• English
  • मराठी

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५०वी जयंती! यानिमित्ताने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५०वी जयंती! यानिमित्ताने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुढच्या पिढीला मागच्या पिढीचे त्याग, विचार आणि जीवनशैली समजवून सांगणे, त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे फार महत्वाचे असल्याने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे विविध उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्यात आले. या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्साह आणि सहभाग कौतुकास्पद होता.