पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या वतीने ‘एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या वतीने ‘एक पाऊल कर्करोग मुक्तीकडे’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत नवीन पनवेल येथील नील हास्पिटलमध्ये गर्भाशय तथा ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर सुरु करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दिपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.