उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मधील APM टर्मिनल्स अंतर्गत असलेल्या ओल्ड मर्क्स कंपनीतील ९९ कामगारांना ५ फेब्रुवारी २०१८ रोजी कामगारांची कोणतेही चूक नसताना, कोणत्याही नोटीसा न देता बळजबरीने कंपनी प्रशासनाने काढून टाकले.
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मधील APM टर्मिनल्स अंतर्गत असलेल्या ओल्ड मर्क्स कंपनीतील ९९ कामगारांना ५ फेब्रुवारी २०१८ रोजी कामगारांची कोणतेही चूक नसताना, कोणत्याही नोटीसा न देता बळजबरीने कंपनी प्रशासनाने काढून टाकले. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज ८ महिने उलटून गेले तरी कामगार वर्ग रोजगारा पासून वंचित आहेत. कामावर त्वरित सामावून घ्यावे यासाठी ओल्ड मर्क्स कंपनी मधील ९९ कामगार १९ नोव्हेंबर पासून कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी भेट दिली. या वेळी पालकमंत्र्यांनी “लोकशाहीच्या माध्यमातून यावर तोडगा काढू व आपल्याला न्याय कसा मिळेल नक्कीच प्रयत्न करु”, असे सांगितले.