• English
  • मराठी

१ जुलै म्हणजे डॉक्टर दिवस!

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे फार कठीण होऊन बसले आहे. तरी या काळातही मनापासून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आहेत. हि डॉक्टर मंडळी मनोभावे रुग्णांची काळजी वाहत असतात यामुळेच आपले जीवन आरोग्यमय आहे. 
१ जुलै म्हणजे डॉक्टर दिवस! या दिवसाचे औचित्य साधून धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्‍या व इतर रुग्णसेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉक्टरांनी त्यांची मते मांडली. हि मते मांडतानाही ते आरोग्याचा संदेश देण्याचे विसरले नाही. अश्या सतत रुग्णांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या डॉक्टरांना माझे नमन!