ओबीसी का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान!
काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व या देशातील समस्त ओबीसी समाजाच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या निषेधार्थ भाजपा पनवेल महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा डी एन ए हा ओबीसी विरोधीच आहे, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष कायमच ओबीसी समाजामागे खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसकडून ओबीसी समाजाचा आणि मोदीजींचा वारंवार होणारा अपमान जनता आता सहन करणार नाही.
मोदीजींच्या नेतृत्वात भारतात होणारे विकासकार्य बघून राहुल गांधींच्या मनात धडकी भरल्याने ते अशी जातीवाचक विधाने करून देशातील सामाजिक समरसता आणि शांती बिघडवू पाहत आहेत; परंतु जनता सुज्ञ आहे, आगामी निवडणुकांमध्ये जनता काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना त्यांची योग्य जागा दाखवेल हे नक्की !