पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण:
पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण:
“महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालय”
अभिनंदन! मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना केलेल्या मागणीनुसार पनवेल उप जिल्हा रुग्णालयाचे “महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालय” नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दशकापासून सामाजिक, आध्यत्मिक क्षेत्रात अविरतपणे मौलिक कार्य सुरू आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला संस्कारी दिशा देण्याचे काम थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी व कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या कार्याचा जगभर गौरव आणि आदर्श आहे, त्या अनुषंगाने नव्याने कार्यान्वित झालेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयास थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचे अध्यादेश शासनाने काढला असून आता पनवेलचे हे रुग्णालय “महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालय” या नावाने ओळखले जाणार आहे.
सदर मागणी मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.