• English
  • मराठी

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइट संस्थेच्या नातं या एकांकिकेने बाजी मारत मानाचा अटल करंडक पटकाविला.

या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, तर सन्माननीय अतिथी म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर, सिने अभिनेते संजय नार्वेकर, लेखक-दिग्दर्शक व अभिनेता अद्वैत दादरकर, अभिनेत्री ऋजुता देशमुख, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, अभिनेते व परीक्षक भरत सालवे, राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.